वा.म. जोशी यांच्या कादंबरी-वाङ्मयातील सुधारणावाद
वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरी-वाड्मयाचा चिकित्सक अभ्यास करून त्यात वास्तववादाचा, गांधीवादाचा, समाजवादाचा शोध घेण्याचा प्रयत्न समीक्षकांनी केला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी वा.म.जोशी यांना तात्विक कादंबरीचे जनक ठरविले आणि केवळ ‘तत्त्वप्रधान कादंबरी’ म्हणून रागिणीचा विचार करून चालणार नाही असा अभिप्रार डॉ. भालचंद्र फडके यांनी दिला. परंतु या तत्त्वचर्चेचे मूल्य कोणते या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी बहुतेक समीक्षकांनी …